Tuesday, September 16, 2025
घरमहाराष्ट्रविधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद वाढदिवसानिमित्त आले...

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद वाढदिवसानिमित्त आले २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य

प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या एका अभिनव आवाहनाला समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ, केक वा इतर भेटवस्तू न आणता, गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल यांसारखे शैक्षणिक साहित्य आणावे, असे आवाहन केले होते.

या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत, तब्बल २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य जमा झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

समाजाप्रती दायित्वाची जाणीव

महिलांवरील अन्याय, अत्याचार, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर अनेक दशकांपासून काम करणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला.

वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संस्था, संघटना आणि नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यात वह्या, चित्रकला साहित्य, पेन, पेन्सिल, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची पुस्तके यांचा समावेश होता.

पुढील पाऊल

डॉ. गोऱ्हे यांनी संकलित साहित्य गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, त्यांच्या या उपक्रमाची राज्यभरात चर्चा होत असून, समाजाप्रती त्यांची बांधिलकी आणि दायित्व याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहिले जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments