Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रसाई परिवार ट्रस्ट कांदिवली चारकोप यांचावतीने अनाथ आश्रम,मूक बधिर शाळा,आदिवासी आश्रम शाळा,वृद्धाश्रममध्ये...

साई परिवार ट्रस्ट कांदिवली चारकोप यांचावतीने अनाथ आश्रम,मूक बधिर शाळा,आदिवासी आश्रम शाळा,वृद्धाश्रममध्ये मदतीचा हात

मुंबई (मोहन कदम) : साई परिवारातर्फे गेली पस्तीस वर्षे राबविण्यात येणारा पितृपक्षातील कार्यक्रम श्री.मंगेश अंकुश रासम यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला.आजपर्यंत अनेक अनाथ आश्रम, मूक बधिर शाळा,आदिवासी भागातील आश्रम शाळा,वृद्धाश्रम यामध्ये हे कार्यक्रम राबवण्यात येतात.यावर्षी अष्टमला मान आश्रम शाळा,विक्रमगड- पालघर व पितृ अमावस्याला जीवन विकास शिक्षण संस्था आश्रम शाळा,शिंगाव येथे संपन्न झाला. सर्व पितृ पक्षला बोंईसर आदिवासी आश्रम शाळा येथे मुलांना साई परिवार ट्रस्ट कांदिवली चारकोप यांचावतीने साईकृपेने आणि सर्वांचा सहकार्याने मुलाना खाऊ आणि जेवण देण्यात आले.तसेच वृक्षारोपणाचा ही कार्यक्रम करण्यात आला.आतापर्यंत ६७५ झाडे लावण्यात आली आहेत.यामध्ये अनेकांचा, सगळ्या पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक यांचा अनमोल वाटा आहे.शाळांमध्ये खाऊवाटप व अन्नदानाचा कार्यक्रम झाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला हीच आयोजक याची पोचपावती होती.या दोन्ही शाळांमध्ये या कामी श्रीयुत मंगेश अंकुश रासम,सौ.मनीषा मंगेश रासम,श्री.अनिल रामनाथ वडके,श्री.शरद नाकती,श्री.महेश वर्मा,श्री. समीर सागवेकर,श्री.संतोष बंडबे,श्री.महेश मेहता व परिवाराचे इतर सदस्य तसेच मान आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश माळी, श्री.भाऊराव सर, आश्रम शाळा शिंगावचे मुख्याध्यापक श्री. दीपक चौधरी,अधिशिका सौ.विद्या पाटील याचे विशेष सहकार्य लाभले.श्री तुलसीदास तांडेल, श्री.यशवंत वातास सर या सर्वांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे कार्यक्रम पार पडला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments