वाई : संपूर्ण महाराष्ट्रात नऊ वर्षांपूर्वी खळबळ माजलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज वाई न्यायालयामध्ये आरोपी डॉक्टर संतोष पोळ यांनी पोलिस तपास अधिकारी यांच्यासह काहींच्या विरोधात न्यायालयात वकिलामार्फत लेखी अर्ज केला असल्याची माहिती या खटल्यातील आरोपीचे वकील अँड .दिनेश धुमाळ यांनी वाई येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
याबाबत त्यांनी सांगितले की प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी वाई यांच्या न्यायालयामध्ये माफीचा साक्षीदार व आरोपी ज्योती पांडुरंग मांढरे यांनी वाई पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यासंदर्भात दिनांक सात नोव्हेंबर २०१६ रोजी न्यायालयात दुपारी तीन वाजता कबुली जबाब दिला होता. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह ,कळंबा यांच्यामार्फत पोलीस निरीक्षक श्री व्ही. बी वेताळ यांनी हा जबाब सादर केला होता. सध्या या खटल्याची वाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
सदर खटल्यातील खून झालेल्या सौ मंगला जेधे, नथमल भंडारी, सलमा शेख यांच्याबाबत डॉक्टर विद्याधर घोटावडेकर विक्रम घोटावडेकर व माफीचा साक्षीदार ज्योती मांढरे पांडुरंग मांढरे, विकास मांढरे, संजय ढम, अजीम मुजावर यांच्यासह पोलीस तपास निरीक्षक व्ही.बी.वेताळ यांचा सहभाग असल्याचा आरोपी डॉक्टर पोळ यांच्या वतीने अर्ज केला आहे.
यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता ३१९ कलमाखाली पुराव्यामध्ये विनाकारण छेडछाड केल्याचा आरोप अर्जात करण्यात आलेला आहे. त्यांना सह आरोपी करावे अशीही मागणी आरोपी डॉ. संतोष पोळ यांच्यामार्फत अँड .दिनेश धुमाळ यांनी सादर केलेल्या अर्जात केली आहे.
माफीचा साक्षीदार असलेल्या आरोपी ज्योती पांडुरंग मांढरे हिने दिलेल्या जाब जबाब नुसार स्कोलिन नावाचे इंजेक्शन घोटवडेकर हॉस्पिटल मधून अजीम मुजावर नावाच्या व्यक्तीने दिल्याचे मान्य केले आहे. तसेच ई.सी.जी. यंत्रणा घोटावडेकर हॉस्पिटल मधूनच आणली आहे. श्री भंडारी च्या गळ्यातील सोन्याची साखळी आरोपी विकास मांढरे यांनी गहाण ठेवली असल्याचे आरोपी ज्योती मांढरे यांनी दिलेल्या जबाबा मध्ये नमूद केल्याची माहिती ॲड दिनेश धुमाळ यांनी दिली.
आरोपी व माफीचा साक्षीदार ज्योती मांढरे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असताना ती गरोदर असल्याने तिला कायम जमीन मिळाला आहे. याचा अर्थ काही गोष्टी तपास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून तपास केला. असा निष्कर्ष निघतो. त्यामुळे त्यांना सह आरोपी करावे असा अर्ज वाई जिल्हा सत्र न्यायालयातील माननीय न्या. आर एन मेहरे यांच्याकडे आरोपी संतोष पोळ यांनी दिला आहे. अशी माहिती एडवोकेट दिनेश धुमाळ यांनी वाई न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधून ही माहिती दिली. त्यावेळी अँड. सागर गाढवे, ॲड .विद्या धुमाळ, अँड .गणेश इथापे, अँड . कोरवार इत्यादी उपस्थित होते. दरम्यान, सदर प्रकरण गंभीर असून न्यायप्रविष्ठ बाब असली तरी कोणावरही अन्याय होऊ नये तसेच अन्याय करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर आंदोलन करेल अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी दिली आहे.—– —– —— —— —– —– —— —— —
फोटो — वाई जिल्हा सत्र न्यायालयात माहिती देताना आदरणीय वकील व मान्यवर
आरोपी डॉ. संतोष पोळ यांच्यावतीने तपास अधिकारी विरोधात न्यायालयात अर्ज..
RELATED ARTICLES