Tuesday, September 16, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबई पोलीस दलातील गणेश आव्हाड ‘COP OF THE MONTH’ म्हणून सन्मानित

नवी मुंबई पोलीस दलातील गणेश आव्हाड ‘COP OF THE MONTH’ म्हणून सन्मानित

वी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, सीबीडी विभागाने माहे ऑगस्ट २०२५ करीता आपल्या उत्कृष्ट सेवेसाठी नेरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई गणेश आव्हाड (पो.शि. ३२२५) यांची ‘COP OF THE MONTH’ म्हणून निवड केली आहे.

गणेश आव्हाड यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक ५४०/२०२५ अंतर्गत बि.एन.एस. कलम ३०५ (अ), ३३० (३), ३३१ (४), ३(५) मधील गुन्ह्याचा तपास करत उत्कृष्ट कार्य केले. त्यांच्या निडर, समर्पित आणि व्यावसायिक कार्यपद्धतीमुळे गुन्ह्याचा छडा लावण्यात आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी गणेश आव्हाड यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि “आपण भविष्यातही अशीच समर्पित व उत्कृष्ट सेवा करत राहाल” असा विश्वास व्यक्त केला. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी सुद्धा आव्हाड यांचे कौतुक केले आहे.

पोलीस दलातील इतर सदस्यांसाठी गणेश आव्हाड यांचे काम प्रेरणादायी ठरत असून, नवी मुंबई पोलीस दलाच्या सेवा वृत्तीला नवा मानबिंदू मिळाला आहे. आव्हाड यांना मिळालेल्या “कप ऑफ द मंथ” सन्मानामुळे त्यांच्यावर पोलिस दलासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments