जनता दल (से.) पक्षाची पदाधिकाऱ्यांची उद्या तातडीची बैठक
मुंबई : जनता दल (से.) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडासाहेब हे ऑक्टोबर महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार असून पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील प्रदेश कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.