प्रतिनिधी : वाशी येथील सिडको एक्झिबिशन येथे नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, पालघर आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. लोकनेते गणेश नाईक यांचा रोखठोक स्वभाव आणि सर्वसामान्यांशी असलेला संवाद या कारणामुळे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या वर्षी नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त “बीज मोदक वृक्ष लागवडीचा श्रीगणेशा” हा उपक्रम राबवण्यात आला. बीज मोदक खाण्यासाठी नसून वृक्षसंवर्धनासाठी असल्याची आठवण उपस्थितांना करून देण्यात आली. धगधगती मुंबई व नागरिक संरक्षण दलाच्या वतीने नाईक साहेबांना “सुवर्णपथ” हा गौरव ग्रंथ भेट देण्यात आला. यावेळी सुयश सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ सर, संपादक भीमराव धुळप आणि नागरी संरक्षण दलाचे क्षेत्ररक्षक अरुण सातपुते उपस्थित होते.