Monday, September 15, 2025
घरमहाराष्ट्रप्रतिक्षा नगरमध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न – बेजबाबदार पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

प्रतिक्षा नगरमध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न – बेजबाबदार पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

प्रतिनिधी : प्रतिक्षा नगरमध्ये आज सायंकाळी अंदाजे साडे सहा वाजता L4 आणि M1 या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. बेस्ट बस अडकून पडल्याने त्या बसच्या मागे सुवर्ण क्रीडा मंडळाच्या हॉलपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. यामागचे मुख्य कारण म्हणजे बेजबाबदार पद्धतीने पार्क केलेली वाहने. M1 च्या वळणावर एका बाजूला व्हॅगनआर कार आणि दुसऱ्या बाजूला ॲम्ब्युलन्स उभी असल्याने बस पुढे जाऊच शकली नाही.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, वाहतुकीसाठी योग्य नियोजन न केल्यास भविष्यात अधिक गंभीर समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः आपत्कालीन सेवा देणाऱ्या ॲम्ब्युलन्सलाही वेळेवर मार्ग मिळाला नाही, ही बाब चिंतेचा विषय ठरत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ‘नो पार्किंग झोन’ निश्चित करणे, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हा प्रश्न कधी सुटणार? प्रशासन दखल घेईल का?

प्रतिक्षा नगरच्या रहिवाशांनी या घटनेवरून प्रशासनाला निवेदन देण्याचा आणि सोशल मीडियावर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने नागरिकांसोबत समन्वय साधावा, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments