कुडाळ (अजित जगताप) : जावळी तालुक्यात वारकरी संप्रदायाची खूप मोठी ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद लाभले होते. तशा पद्धतीने जावळीतील वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद मिळाला हीच भावना आहे वारकरी सांप्रदायाच्या पाठीशी सदैव उभा राहीन असा सार्थ विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ ता. जावळी येथे सत्कार समारंभाला उत्तर देताना व्यक्त केला.
कुडाळ येथील स्वामी मंगल कार्यालयामध्ये जावळी तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने मंत्री नामदार भोसले यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम तीन तास उशिरा सुरू झाला तरी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. वारकऱ्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा दांडगा उत्साह पाहून मंत्री महोदय भारावून गेले.
यावेळी युवा नेते जयदीप शिंदे, एकनाथ रोकडे, सलीम आत्तार, रविंद्र परामणे, विलासबाबा जवळ, सचिन पाटील, संदीप परामणे , मच्छिंद्र मुळीक, मनोज परामणे, सुनिल पवार,मालोजीराजे शिंदे, तानाजीराव शिर्के, राजू गोळे, सुहास गिरी व अतिमहत्वाचे वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
जावळी तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे, माजी आमदार भिलारे गुरुजी यांनी सुरू केली आहे. आजही मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाची ताकद जावळी तालुक्यात आहे. वारकरी संप्रदाय चांगली शिकवून देत असल्याने मंत्री म्हणून नव्हे तर सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. असे स्पष्ट करून नामदार
शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लांब आहेत. आरक्षणावर चर्चा सुरू आहे. परंतु, न्यायालयात आता त्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत बोलत नाही. भाष्य करत नाही.
मराठा आरक्षणाच्या जी.आर. नंतर काहींनी टीका टिपणी केली आहे. त्याला उत्तर देणे इतकी तेवढी त्यांची उंची नाही. पंढरपूरला कुणालाही निमंत्रण नसताना वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. हाच खरा वारकरी संप्रदाय आहे. सातारा- जावळी मध्ये भजनी मंडळाच्या स्पर्धा घेण्यासाठी तसेच त्यांची कामे करण्यासाठी तन-मन-धन अर्पण करीन असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुडाळ गाव वाढत आहे. त्यामुळे सोनगाव ते रायगाव, आखाडे ते कुडाळ आणि कुडाळ ते पाचवड, करहर- कुडाळ असे चांगले रस्ते तयार होत आहेत. विकास कामांमध्ये सर्वांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाला उशीर झाल्याने वेळेअभावी इतरांना बोलण्याची संधी मिळाली नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी जावळी तालुक्यातील भजनी मंडळ वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच आनेवाडी, रायगाव, आखाडे , हुमगाव, वालुथ, महिगाव , पवारवाडी, सायगाव ,रायगाव,मोरघर, कुडाळ, शेते, सोमर्डी , बामणोली , म्हसवे, सरताळे, करहर, मेढा , गोपाळ पंत वाडी, खर्शी, इंदवली ,जवळवाडी, दरेखुर्द, सोनगाव , भिवडी, सरताळे येथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याला जयदीप शिंदे , सुहास गिरी अशी मोजकीच भाषणे झाली. सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गोळे यांनी प्रस्ताविक केले तर वीरेंद्र शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी वाहन व भोजन व्यवस्था चोख करण्यात आली होती. कुडाळ येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी व फटाक्याचे आतिषबाजी यातून गटबाजीचा ही धूर निघाल्याची चांगलीच चर्चा सुरू झालेली आहे. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी उदय जगताप, संजय निकम, उमाकांत जाधव, सुरेशराव मोरे, अशोक जगताप, अभिजीत दुदुस्कर, अनिल जगताप, अजय सपकाळ, संतोष शेलार, दत्ता पवार मेढेकर, पांडुरंग जवळ, तसेच विविध गावचे सरपंच सोसायटी चेअरमन सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद मिळावा हीच भावना-मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले
RELATED ARTICLES