वाई(नितीन गायकवाड) : महाराष्ट्र असोसिएशन राष्ट्रीय लेव्हल ओपन अबॅकस २०२५ यांच्यावतीने पुणे, निगडी येथे घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेत एस. ग्रुप, वाई येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये कुमारी विश्वा नितीन गायकवाड, कु. शुभ्रा तळपदे, कु. राजवीर किशोर गोळे, स्मिथ गायकवाड आणि अनय गोळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत “चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन” हा किताब मिळवला.
या यशाबद्दल एस ग्रुप वाई तसेच वाई परिसरातील नागरिकांच्या वतीने संबंधित विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील स्पर्धांसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यशस्वी कामगिरीसाठी एस ग्रुपच्या सर्वेसर्वा आदरणीय शिफा अत्तार मॅडम, रूपाली मॅडम आणि सर्व शिक्षक वर्गाने केलेल्या योगदानाबद्दल पालक वर्गातून ऋण व्यक्त करत विशेष आभार मानण्यात आले.
या प्रसंगी सुप्रिया ट्रॅव्हल्सचे मालक श्री. किशोर गोळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच त्यांनी एस ग्रुप अबॅकससाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढावे यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.