तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने सन 2014 पासून संदीप डाकवे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करुन महाराष्ट्रभर आपली छाप उमटवली आहे. ट्रस्टने राबवलेल्या या उपक्रमांचा समाविष्ट करत एक गौरवगीत तयार केले आहे त्याचे प्रकाशन महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम यांनी नुकतेच केले. त्यांनी या गाण्याचे कौतुक केले आहे. या गौरव गीताचे स्वागत संगीतप्रेमी नक्कीच करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
स्पंदन गौरव गीताचे लेखन गीतकार धनाजी मोहिते (उमरकांचन) यांनी केले आहे. तर आंबुळे म्युझिकचे योगेश आंबुळे यांनी या गीताला आवाज आणि संगीत दिले आहे. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांच्या कलाकौशल्याची जाणीव यामधून दिसून येत आहे.
पार्श्वगायिका कविता राम यांनी स्पंदन गौरव गीताच्या प्रकाशनाबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन केले आहे. कविता राम या राज्यातील सुप्रसिध्द प्रसिद्ध गायकांमध्ये गणल्या जातात. राज्यातील विविध व्यासपीठांवर त्यांनी आकर्षक सादरीकरणाने प्रेक्षक आणि कलाप्रेमींना मोहित केले आहे.
‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी हे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या उपक्रमांना समाजातून नेहमी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार, सेवाव्रती पुरस्कार इत्यादी पुरस्कारानी ट्रस्ट ला गौरवले आहे.
पार्श्वगायिका कविता राम यांनी केले स्पंदन गौरव गीत प्रदर्शित
RELATED ARTICLES