वाई(विजय जाधव) : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत वासोळे, कोंढावळे, पाचवड येथील घरकुल लाभार्थींना पहिल्या हप्त्याचे वितरण मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षानुवर्षे उघड्यावर संसार करणाऱ्या कातकरी समाजाला हक्काचे घर मिळणार असल्याने त्यांनी पहिला हप्ता स्विकारताना थेट नामदार मकरंद आबा पाटील यांना तुमच्यामुळे हक्काचे घर मिळाले, लई उपकार झाले, अशी हात जोडून साद घातली. तर यावेळी “वंचित समाजाच्या कल्याणासाठी मी नेहमीच कार्यरत राहीन,” असे प्रतिपादन ना. मकरंद पाटील यांनी ग्वाही दिली.वाई तालुक्यातील वासोळे, कोंढावळे येथील कातकरी समाजातील लाभार्थींना घरकुलासाठी जमीन खरेदीसाठी तर पाचवड येथील शासकीय जमिनीवरील लाभार्थींना प्रथम हप्ता शनिवार दि.१३ सप्टेंबर रोजी वाटप करण्यात आला. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री जनमन योजना ही आदिवासी व वंचित घटकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. त्याअंतर्गत कातकरी समाजातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक ते साहाय्य दिले जात आहे. जागा नसलेल्या २२ कातकरी लाभार्थ्यांना पाचवड येथे शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे काम तत्कालीन प्रांत राजेंद्र कचरे, तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी आणि तालुका भूमिअभिलेख अधिकारी साठे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी शाम राठोड, ग्रामपंचायत अधिकारी मोहन कोळी, उमेश भिसे, प्रीतम ओंबळे, पाचवड सरपंच महेश गायकवाड तसेच कातकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आबा, हक्काचे घर, लई झाले उपकार कातकरी समाजाला घरकुलाचा पहिला हप्ता वाटप
RELATED ARTICLES