Friday, September 12, 2025
घरमहाराष्ट्रराज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर ॲड. संग्राम शेवाळे यांची नियुक्ती

राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर ॲड. संग्राम शेवाळे यांची नियुक्ती

प्रतिनिधी. : महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड. संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी लंडन येथून आपलं कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ते भारतात परतले आणि शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी अनेक राज्यव्यापी उपक्रम राबवले. विद्यार्थी, युवक व इतर समाजघटकांच्या प्रश्नांवर ते सतत कार्यरत असतात.

राज्य सरकारने त्यांची राज्य युवा धोरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी मा. पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.माणिकराव कोकाटे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

‘या समितीच्या माध्यमातून युवकांसाठी शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक नेतृत्व आणि आत्मनिर्भरतेसाठी नवे व प्रभावी मार्ग शोधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. महाराष्ट्रातील युवकांच्या स्वप्नांना बळ देणारे, त्यांना संधी उपलब्ध करून देणारे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करणारे धोरण निर्माण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.’ असे मत ॲड. संग्रामसिंह शेवाळे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments