Thursday, September 11, 2025
घरमहाराष्ट्रसेंट अग्रसेन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘साइन्स एक्झिबिशन २०२५-२६’ – पालक व...

सेंट अग्रसेन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘साइन्स एक्झिबिशन २०२५-२६’ – पालक व कुटुंबीयांना आमंत्रण

कल्याण पूर्व : कमलाबाई एज्युकेशनल अँड चारिटेबल ट्रस्ट यांच्या व्यवस्थापनाखाली सेंट अग्रसेन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कलवा (पूर्व) येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नावीन्यपूर्ण आणि सृजनशील प्रकल्पांचे सादरीकरण होणार असून, पालक आणि कुटुंबीयांना या उपक्रमास भेट देण्याचे विनम्र आमंत्रण दिले आहे.

कार्यक्रम दिनांक १३ सप्टेंबर २०२५, सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत शाळेच्या ऑडिटोरियममध्ये पार पडेल. विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि कल्पकता यांचे प्रात्यक्षिक पाहण्याची ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पवन जी. अग्रवाल (एम.कॉम., बी.एड., एल.एल.बी., ए.सी.एस., पीएच.डी.), इंग्रजी माध्यमासाठी प्राचार्या वैशाली घोलाप, हिंदी माध्यमासाठी प्राचार्य दिनेश यादव आणि प्रशासनासाठी लताबेन मेहता हे उपस्थित राहणार आहेत.

सर्व पालक व कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments