प्रतिनिधी : मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्ज प्रकरणाबाबत कारवाई केली जाते मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांकडून त्या कर्ज वितरणात अडवणूक केली जाते, यापुढे महामंडळाने मंजूर केलेली कर्ज प्रकरणे जर अडवणूक झाल्यास संविधानिक लढा दिला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या *कर्ज प्रकरण प्रक्रिया* मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पोपटराव भिसे होते, यावेळी युवराज मोहिते, दिलीप महाजन, अरुण मोहिते, सातारा जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष हेमलता कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी काही पदाधिकारी निवडी समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे यांनी जाहीर केल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश मोटे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू मुजावर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव देवकांत, सातारा जिल्हा उपाध्यक्ष हेमलता कारंडे, सातारा जिल्हा कार्यकारी सदस्य जयवंत इंगळे, कराड तालुका अध्यक्ष सविनय सोरटे, उपाध्यक्ष अधिकराव चव्हाण आदींच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, समितीच्या माध्यमातून समितीची ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून शासन, प्रशासन आणि बँका यांचा समन्वय साधून जास्तीत जास्त कर्ज प्रकरणांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर कशा केल्या जातील यासाठी प्रयत्न केला जाईल. असे सांगून विश्वास मोहिते म्हणाले की ज्यांना सोबत यावयाचा आहे त्यांनी कृपया आमच्या विभागीय आणि जिल्हा समितीचे संपर्क साधून समिती सोबत राहून समाजाची सेवा असे आवाहन यावेळी केले.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी आणि तालुका अध्यक्ष यांनी आपल्या प्रोटोकॉल नुसार समाजसेवेत कार्यरत राहावे. या मेळाव्यास विश्वासराव मोहिते, अरुण मोहिते, संपतराव मोहिते, युवराज मोहिते,पोपटराव भिसे, दिलीप महाजन, आकाश सोरटे, दिपाली वाघमारे, सतीश मोटे, नवनाथ चव्हाण, जयवंत इंगळे, प्रशांत चव्हाण,विजय पवार, शशिकांत वाटेगावकर, तानाजी शिवराम चव्हाण, विक्रम चव्हाण, सुधीर दादासाहेब जाधव, विजय चव्हाण, सय्यद इनामदार, आबा सोरटे सविनय सोरटे,समाधान सोरटे,अंकुश सोरटे,सह सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक युवराज मोहिते यांनी केले तर आभार अरुण मोहिते यांनी मानले.