मुंबई (शांताराम गुडेकर) : मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित जी.के.एस कला ,वाणिज्य व महाविद्यालय खडवली येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कौशल्य सादर केले. सदर कार्यक्रमाला संस्था संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम,वरीष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.प्रशांत तांदळे सर,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.शेख शफीक सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी अध्यापन करत शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमास प्रा.दिनेश घरत, प्रा.लोकरे मॅडम, प्रा.रिया बांगर मॅडम, प्रा. गायकवाड प्राची मॅडम व इतर शिक्षकांनी अथक मेहनत घेवून हा उपक्रम यशस्वी केला.
जी.के.एस महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
RELATED ARTICLES