Thursday, September 11, 2025
घरमहाराष्ट्रमहंत आहिल्यागिरीजी महाराज यांनी घेतली डाकवे कुटूंबियांची भेट

महंत आहिल्यागिरीजी महाराज यांनी घेतली डाकवे कुटूंबियांची भेट

तळमावले/वार्ताहर : सातारा जिल्हयातील कापसेवाडी येथील परमपुज्य ब्रम्हलीन महामंडलेश्वर वैराटवासी स्वामी आबानंदगिरी महाराज समाधी मंदीर शिवदत्त मठ येथील महंत आहिल्यागिरीजी महाराज यांनी संदीप डाकवे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचे औचित्य साधत त्यांनी या कुटूंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भक्तगण होते.
डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही संदीप डाकवे आणि त्यांचे कुटूंबीय यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबवलेल्या नावीण्यपूर्ण उपक्रमाची माहिती आहिल्यागिरीजी महाराज यांनी घेतली.
डाकवे परिवाराचे आधारवड असलेल्या राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवलेल्या रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्मृती आरोग्य कार्यक्रम इ. उपक्रमांचे महंत आहिल्यागिरीजी महाराज यांनी कौतुक केले.
दरम्यान, महंत आहिल्यागिरीजी महाराज यांचे स्वागत गयाबाई डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, पारुबाई येळवे, संदीप डाकवे यांनी शाल, श्रीफळ देवून केले. यावेळी डाकवे कुटूंबातील अन्य सदस्य, नातेवाईक व पाहुणे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments