कराड (अमोल पाटील): जिंती तालुका कराड येथे काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात वनविभागाने जिंती व परिसरात कॅमेरे लावून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने जिंती ग्रामपंचायत जवळ आणि श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती येथे वनविभागाकडून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात वनाधिकारी चिकाटे साहेब यांनी बिबट्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाची सुरुवात संभाजी खोसरे सर यांच्या प्रास्ताविकाने झाली तर आभार तपासे सर यांनी मानले.
ग्रामपंचायतीने विद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च उचलल्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये – बिबट्याविषयी मार्गदर्शन
- जनजागृती:
- बिबट्याचे नैसर्गिक वास्तव्य – जंगल, डोंगराळ भाग
- त्याची शिकारीची पद्धत, आहार व सवयी
- माणूस आणि बिबट्या संघर्षाची कारणे
- सुरक्षिततेचे मार्गदर्शन:
- गावाजवळ किंवा शाळेजवळ बिबट्या दिसल्यास काय करावे / काय करू नये
- लहान मुलांनी जंगलाजवळ एकटे न जाणे
- घरगुती पाळीव प्राण्यांना रात्री सुरक्षित ठेवणे
- वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व:
- बिबट्या हा परिसंस्थेतील समतोल राखणारा महत्त्वाचा प्राणी आहे
- त्याचे अस्तित्व जंगल आणि शेती दोन्हीला फायदेशीर ठरते
- शाळेतील उपक्रम:
- चित्रफित, स्लाइड शो आणि माहितीपत्रके दाखवून शिक्षण
- विद्यार्थ्यांचे प्रश्नोत्तरे घेणे आणि सुरक्षिततेचे उपाय प्रात्यक्षिकाने दाखवणे
- जागरूकता संदेश:
- “वन्यजीव आपले मित्र आहेत.”
- “जंगल वाचवा – बिबट्या वाचेल.”
- “सुरक्षित अंतर ठेवा, घाबरू नका.”
या कार्यक्रमामुळे जिंती व परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, ग्रामस्थांनी वनविभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.