कोरेगाव(अजित जगताप) : महायुती तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विकास कामासाठी निधी मंजूर करून आणतात. परंतु या निधीसाठी फक्त ठेकेदारी म्हणून लक्ष केंद्रित करणाऱ्या शिव समर्थ सारख्या ठेकेदारांनी कोरेगाव- वाठार स्टेशन रस्त्याची खोदाई करून कामच केले नाही. त्याचा प्रचंड त्रास वाहनधारक व नागरिकांना होत आहे. आत्तापर्यंत शेकडो अपघात झालेले आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करा अन्यथा दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश अनिल उबाळे यांनी घेतलेला आहे. त्यापूर्वीच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे यांच्याकडे निवेदनाद्वारे धाव घेतली आहे.
कोरेगाव ते वाठार स्टेशन हा रस्ता पाच ते दहा फुट खोदून ठेवलेला आहे. या पावसाळ्यात कुटुंबाची जबाबदारी असलेले अनेक जणांचे अपघात झालेले आहेत .कोरेगाव पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी यांचा हात मोडला. गंभीर दुखापत झाली ,गर्भवती महिला दुचाकी गाडीवरून घसरून पडली, वयस्कर नागरिक, तरुण असे दररोज अपघात सत्र चालू आहे. याला सर्वस्वी जबाबदार शिव समर्थ कंपनी आहे. त्याची वाहनधारकांना खात्री पटलेली आहे.
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते? हेच कळायचं बंद झालेला आहे. संपूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे. त्याला सेफ्टी फॅक्टर्स कसल्याही पद्धतीच्या नाहीत ,सुरक्षतेसाठी दिशा फलक लावणे गरजेचे आहे. रोड सेफ्टी रिप्लेक्टर, बॅरिकेटिंग टेप, खूप ठिकाणी मोठ्या खड्ड्यात पाणी साचलेला आहे. त्यामुळे खड्डा किती मोठा आहे. हेच वाहन चालकांना कळत नाही. रस्त्यावरच्या खडीमिश्रित चिखलामुळे शेकडो गाड्या घसरून पडतात. त्यात गंभीर दुखापत होते. यामध्ये कुणाच्या जीवित नुकसान झाले आहे का? याची माहिती घ्यावी लागेल. परंतु, नागरिकाच्या जीविताशी खेळू नये ,सातारा पंढरपूर रस्त्याला मेघा इंजीनियरिंग कंपनी दुष्काळजीपणाने ६१ अपघातात या रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या नागरिक जीव गमवावा लागला आहे. असे निवेदनात नमूद केले आहे.
आता कोरेगाव ते वाठार रस्त्याला किती नागरिकांचा बळी घेणार ?हा विषय अतिशय महत्त्वाचा व गंभीर आहे तरी, सदर कॉन्ट्रॅक्टर वर त्वरित कारवाई करा त्यांना काम करायचे नसेल तर ब्लॅक लिस्टमध्ये टाका जर संबंधित कंपनीकडे पुरेशी यंत्रणा नव्हती तर पूर्ण रस्ता खोदला कशासाठी? एक बाजूचा रस्ता तसाच ठेवून दुसऱ्या बाजूचा रस्ता करणे गरजेचे होते. परंतु, असे न करता संपूर्ण रस्ता खोदून हजारो लोकांच्या जीविताशी खेळत असलेल्या कॉन्ट्रॅक्टर वर चौकशी करून तात्काळ कारवाई करा , दररोज उघड्या डोळ्याने सर्वसामान्य माणसांचे होणारे अपघात किती दिवस बघायचे ? कारवाई करा. अशी ही विनंती करण्यात आलेली आहे.
अन्यथा दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलनास मी बसत आहे. या आंदोलनाकडे दुर्लक्ष होऊ नये. असे निवेदनात नमूद करून निवेदनाच्या प्रती अनेक मान्यवरांना पाठवण्यात आलेले आहेत.
______________________________
फोटो – कोरेगाव- वाठार स्टेशन रस्त्या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश अनिल उबाळे (छाया- अजित जगताप सातारा)