मुंबई (पंकजकुमार पाटील): घाटकोपर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयाचे सुरेश शंकर जाधव सर गेली आठरा वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक दिनानिमित्त कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना ‘परमपूज्य साने गुरुजी राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार व पद्मश्री पुरस्कार प्राप्त अच्युत पालव सर यांच्या हस्ते देण्यात आला.
कला शिक्षक जाधव यांनी चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. चित्रकला स्पर्धा, फलक लेखन यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजवली.
कार्यक्रमाचे आयोजन कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अनघा जाधव यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिगंबर तायडे, कॅप्टन मनोज भामरे व श्री. रामजीत गुप्ता उपस्थित होते.