मुंबई(रमेश औताडे) : मुंबईतील कूपर रुग्णालयातील उंदरांचा वाढता त्रास अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. वॉर्डमध्ये, बेडखाली आणि पॅन्ट्री परिसरात उंदरांचे दर्शन होत असल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वच्छतेच्या उपाययोजना करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे आता रुग्ण मित्र संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, तातडीने ठोस उपाय न केल्यास आम्ही आक्रमक पवित्र घेऊ. या सर्व पार्श्वभूमीवर रुग्णालयातील उंदरांनी प्रशासनाला लावले कामाला लावले अशी चर्चा सुरू आहे.
नातेवाईकांचे म्हणणे आहे की, उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. “दवाखान्यात उपचारापेक्षा उंदरांची भीती जास्त वाटते. दररोज उंदीर पकडले जात आहेत म्हणजे समस्या गंभीर आहेच. जर प्रशासनाने खरेच जबाबदारी घेतली असती, तर एवढा मोठा त्रास निर्माण झाला नसता. जर लगेच बदल झाला नाही, तर आम्हाला रुग्णांच्या हक्कासाठी आम्ही आक्रमक झालो तर ? असे नातेवाईकांनी स्पष्ट केले.
रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेची उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला असला तरी रुग्णांचा अनुभव मात्र वेगळाच आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर ठोस कारवाई न झाल्यास कूपर रुग्णालयासमोर रुग्ण व नातेवाईकांचा आक्रोश पहावयास मिळेल.