मुंबई : वडाळा विधानसभा क्षेत्रातील रफी अहमद किडवाई रोड, शिवडी-वडाळा येथील शाईन दरबार हॉटेल समोरील किडवाई नगर परिसरात आज “जश्ने ईद-ए-मिलादुन नबी”चा १५०० वा उत्सव मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेना आणि पुरस्कृत शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने येथील मुस्लिमबहुल मोहल्ल्यातील बांधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच लहान बालकांसाठी खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक व शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री. सुरेश गणपत काळे यांच्या नेतृत्वाखाली गटप्रमुख श्री. सैयद अन्वरअली, फारूख शेख, पप्पू खान, नियाज अली, अस्लम खान, रशिद शेख, शौकत अली, अमीर खान, जावेद खान, सैफअली, बंटी शेख, लक्की खान, मैताब आलम यांसह अनेक शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेस प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा कार्यक्रमांतून विविध समाज घटकांमध्ये सौहार्द वृद्धिंगत होण्यास मदत होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली.