मुंबई : दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या दोन अल्पवयीन मुली आरजू अन्वर शेख (वय १७ वर्षे) आणि अर्सिया अन्वर शेख (वय १५ वर्षे) या उपचारासाठी भाभा रुग्णालय, बांद्रा पश्चिम येथे जातो असे सांगून घराबाहेर गेल्या. मात्र, अद्याप त्या घरी परतल्या नाहीत.
फिर्यादी यांनी त्यांचा परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता कोणताही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून मुलींना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत निर्मल नगर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात ६५७/२५ कलम १३७(२) बीएनएस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोन्ही अल्पवयीन मुलींबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस उपनिरीक्षक विजय धस (मो. ९४०५३५७२६५) यांच्याशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.