पुणे(प्रताप भणगे ) : पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार सर यांना ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे टीम तर्फे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये २८ सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन हा पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये (पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर) मोठ्या उत्साहात आणि जनजागृतीच्या वातावरणात साजरा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त सरांनी सांगितले की, सर्व शासकीय कार्यालयांना माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत आवश्यक सूचना निर्गमित केल्या जातील.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रचार प्रमुख अमित कांबळे सर, श्रद्धा राठी, प्रणिता राठी आदी मान्यवर उपस्थित होते.