Tuesday, September 9, 2025
घरमहाराष्ट्रज्ञानदीप ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा उंब्रज...

ज्ञानदीप ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा उंब्रज शाखेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व दीपप्रज्वलन कार्यक्रम

उंब्रज – ज्ञानदीप ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मुंबई या बँकेच्या उंब्रज शाखेचा ४८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात प्रसाद भगवान वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. सोबत श्री दुष्यंतराव जगदाळे (नाना), संचालक – ज्ञानदीप संस्था, तसेच श्री सदाशिव रामुगडे (सनी), शाखाधिकारी, बँकेचे सेवक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बँकेच्या कामगिरीचा आढावा घेतला असता, आजअखेर बँकेकडे ६५०० कोटींचा संमिश्र व्यवसाय असून १५% लाभांश देणारी ही एकमेव क्रेडिट सोसायटी असल्याचे सांगण्यात आले. उंब्रज शाखेकडे २०२४/२५ या आर्थिक वर्षाअखेर ३८ कोटींच्या ठेवी आणि २२ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. महाराष्ट्रात एकूण ११० शाखा असून त्यापैकी ८०% शाखा स्वमाल

कीच्या जागेत व वास्तूत सुरू आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे.

या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि बँकेच्या सामाजिक व आर्थिक योगदानाची जाणीव निर्माण व्हावी, असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments