प्रतिनिधी : सप्टेंबरच्या सुरुवातीला साधारणपणे पावसाचा जोर कमी होतो, मात्र यंदा पावसाने अजूनही माघार घेतलेली नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस सुरू असल्याने हवेतील दमटपणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
हवामानातील दमटपणामुळे डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला आणि पोटाचे विकार यांसारखे आजार झपाट्याने वाढ होऊ शकते. मागील पंधरवड्यातील तुलनेत विविध आजार वाढले असून, पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण उपचारासाठी येत आहेत. खासगी दवाखान्यांत तशीच स्थिती आहे.
पालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सततच्या पावसामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. नागरिकांनी उघड्या पाण्यात जाणे टाळावे, उकळलेले पाणी प्यावे आणि डासांपासून बचावासाठी काळजी घ्यावी. उकळलेले पाणी प्यावे, ताजे अन्नच सेवन करावे, ताप, अंगदुखी किंवा उलटी यासारखी लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेले आजारी वातावरण सध्या मुंबईकरांसाठी मोठे आव्हान बनले आहे. पावसाची साथ आणि आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता व आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.