Monday, September 8, 2025
घरमहाराष्ट्रविसर्जनावेळी श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराकडून गणेश भक्तांना पुरी भाजी

विसर्जनावेळी श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराकडून गणेश भक्तांना पुरी भाजी

मुंबई (पी.डी.पाटील) : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कै राजेंद्र विश्राम चव्हाण यांच्या स्मरणार्थ, गणेश भक्तांना पुरी-भाजीचे वाटप करण्यात आले.
चिंचपोकळी पश्चिम येथील, आर्थर रोड परिसरातून मुंबईतील सर्व नामांकित गणेश मुर्त्या, चौपाट्टी येथे विसर्जना साठी जातात. गणेश दर्शनसाठी मुंबई,वाशी, विरार, ठाणे, अंबरनाथ परिसरातून हजारो गणेशभक्त आपल्या परिवारासह दर्शना साठी येतात. त्यांच्या साठी ही सोय करण्यात आली होती. याचा लाभ हजारो गणेश भक्तांनी घेतला.
श्री स्वामी कट्टा परिवाराचे अध्यक्ष – आनंद पेवकर, कोषाध्यक्ष – रवींद्र रेवडेकर, नंदू गावडे, सल्लागार – भास्कर साळुंके, माजी अध्यक्ष – बाळ पंडित, विशाल मेस्त्री, नरेश पाटील, मनिषा सावंत, नीलम देवधरे, स्वाती रेवडेकर, मनिषा शिरसेकर, अंकिता पेवकर, व जयश्री सावंत यांनी फारच मेहनत घेतली होती.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments