Monday, September 8, 2025
घरमहाराष्ट्रआदर्श वार्ताहर “आरती संग्रहाचे” वाटप; सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वांकडून कौतुक

आदर्श वार्ताहर “आरती संग्रहाचे” वाटप; सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वांकडून कौतुक

मुंबई : दरवर्षी श्री गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो . या उत्सवाच्या निमित्ताने पाक्षिक आदर्श वार्ताहर वृत्तपत्रामार्फत सलग दुसऱ्या वर्षी आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . आरती संग्रह प्रकाशित झाल्यानंतर त्याचे वाटप विविध गणेशोत्सव मंडळ,मान्यवर व्यक्ती, नातेवाईक, मित्र मंडळी व गणेश भक्तांना करण्यात आले. हे पुस्तक हाती मिळताच त्याचे कौतुक सर्वांनीच केले. सर्वानाच पारंपरिक आरत्या पाठ नसतात. त्यामुळे गणेशोत्सव असो किंवा इतर धार्मिक कार्यात आरत्या घेण्यासाठी या आरती संग्रहाचा नक्कीच उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला.
सदर आरती संग्रहाबद्दल साऱ्यांनीच कौतुक केल्याने पुढील काम करण्यासाठी नक्कीच उत्साह वाढेल व यापुढे असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे प्रयत्न केले जातील असे मत संपादक पंकजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments