तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि.9 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रतिमा पुजन, पुष्पवृष्टी, मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीर, महाप्रसाद, तर रात्री 7.00 ते 9.00 वाजेपर्यंत ह.भ.प.जयश्रीताई महाराज धायटी यांचे सुश्राव्य कीर्तन इ.कार्यक्रमांचे चे आयोजन मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा या ठिकाणी केले आहे.
राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा इ.उपक्रम राबवत वडीलांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.
तृतीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गयाबाई डाकवे, भरत डाकवे, विठ्ठल डाकवे, विश्वनाथ डाकवे, संदीप डाकवे व समस्त डाकवे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
राजाराम डाकवे (तात्या) यांचे तृतीय पुण्यस्मरण मंगळवारी
RELATED ARTICLES