मुंबई : “समाजाला आपण काहीतरी देणं लागतो” या भावनेतून सामाजिक, शैक्षणिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. भिमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप यांची इंडियन एक्सलन्स स्टार अवॉर्ड २०२५ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पंचरत्न मित्र मंडळ – मुंबई (रजि.) व महाराष्ट्र न्यूज 18 पोर्टल चॅनल, न्यूज 18 महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जात आहे. कार्यक्रम रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता विक्रोळी (पू) येथील कन्नमवार नगरमधील विकास कॉलेजमध्ये पार पडणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. अशोक भोईर भूषवणार आहेत.
“एक वही, एक पेन” : समाजोपयोगी उपक्रमात सहभाग
गणेशोत्सव व वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. भिमराव धुळप यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या “एक वही, एक पेन” या उपक्रमात सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे प्रणेते पत्रकार राजू झणके यांच्याकडे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य सुपूर्द केले.
शिक्षण ही खरी संपत्ती असल्याच्या जाणीवेतून विद्यार्थ्यांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे कार्य धुळप नेहमीच करत आले आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मोठा दिलासा मिळतो.
पत्रकारिता हे केवळ व्यवसाय न मानता सामाजिक जबाबदारी मानणारे श्री. भिमराव धुळप यांचे कार्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे आहे. सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींमध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण सहभागामुळे समाजात सकारात्मकता निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा इंडियन एक्सलन्स स्टार अवॉर्ड २०२५ हा सन्मान निश्चितच आगामी वाटचालीसाठी प्रेरणादायी प्रवास ठरेल.