Monday, September 8, 2025
घरमहाराष्ट्रबोरीवलीत ६५वा श्री गणेशोत्सव उत्साहात; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांचा सन्मान

बोरीवलीत ६५वा श्री गणेशोत्सव उत्साहात; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांचा सन्मान

बोरीवली : राजेंद्र नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आयोजित यंदाच्या ६५व्या वर्षीच्या श्री गणेशोत्सवात भाविकांसह मान्यवरांनीही श्री गणेशाचे आशीर्वाद घेतले. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी गुरुजी यांचा मंडळाच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष अभिलाष कोंडविलकर, उपाध्यक्ष श्याम कदम व सहखजिनदार संदीप कदम यांच्या हस्ते त्रिवेदी यांना शाल, श्रीफळ व स्मरणिका प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयानंद पेडणेकर, सुधीर परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री गणेशोत्सवाच्या ६५व्या वर्षीच्या या सोहळ्यात सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. मंडळाचे हे कार्य समाजात एकता, श्रद्धा आणि सेवाभाव जागवणारे ठरत असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments