मुंबई : “महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनातील इच्छा पूर्ण करा गणपती बाप्पा, आवाज मराठीचा – महाराष्ट्रात फक्त मराठीच!”
याच संदेशाला अधोरेखित करणारा देखावा चेंबूर विधानसभा क्षेत्रातील कट्टर मनसे सैनिक,विधानसभाध्यक्ष माऊली थोरवे यांच्या निवासस्थानी साकारण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार “महाराष्ट्रात मराठी टिकलीच पाहिजे, त्यासाठी रस्त्यावर उतरू मात्र मराठी भाषा टिकवू” हा ठाम संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.
या देखाव्यातून मराठी भाषा जपण्याचा, तिचे अस्तित्व टिकवण्याचा ठोस संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. सामाजिक भान आणि मराठी संस्कृतीवरील प्रेम यांचा संगम असलेला हा देखावा पाहण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहाने गर्दी करत आहेत.
थोरवे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, मराठीचा अभिमान जपणाऱ्या या कल्पनेचे स्वागत होत आहे. दर्शनाला अणुशक्तीनगर विधानसभा अध्यक्ष रवींद्र शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.