प्रतिनिधी: रामपाल सिंग मेमोरियल विशेष टीचर अवॉर्ड हा रामपाल सिंग मेमोरियल फाउंडेशनने सुरू केलेला एक विशेष पुरस्कार आहे . पुरस्काराचे वितरण 22 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश मधील जसईपूर जिल्हा बांदा येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे .रामपाल सिंग हे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष होते तसेच सार्क शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष,आणि जागतिक शिक्षक संघटनेचे समन्वयक होते.
विद्यार्थी आणि समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणलेल्या शिक्षकांना ओळखण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार आहे . हा पुरस्कार दिवंगत रामपाल सिंग यांनी शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि सर्वांसाठी दर्जेदार शिक्षणासाठीच्या वारसा पुढे नेण्याचा एक प्रयत्न आहे. या पुरस्काराद्वारे, फाउंडेशन हा संदेश देऊ इच्छिते की शिक्षकाचे योगदान केवळ वर्गापुरते मर्यादित नाही, तर ते समाजाची दिशा आणि भविष्य निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावते. शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि आदराचे प्रतीक आहे . आदर्शांनी, सेवा आणि नवोपक्रमाने शिक्षण क्षेत्र समृद्ध केले आहे,त्या शिक्षकांना
आदराचे चिन्ह म्हणून
शिक्षकांना ₹११,००० (अकरा हजार रुपये), प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.
देशातून या पुरस्कारासाठी फक्त पाच शिक्षकांचे निवड केली जाते. विजयकुमार किसन भुजबळ हे बोराटवाडी, तालुका माण चे सुपुत्र असून या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. भुजबळ हे सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात, ते स्वतः एक उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत.त्याचे www.vkbeducation.com आणिwww.great-indian.com हे शैक्षणिक ब्लॉग असून याचा विद्यार्थी व शिक्षकांना उपयोग होत आहे. भुजबळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्तम शैक्षणिक ,सामाजिक कार्य केले असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेतांब तालुका महाबळेश्वर या ठिकाणीही उत्कृष्ट कार्य केले आहे.
ते सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर येथे कार्यरत असून
सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात.
विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा
सामाजिक उपक्रम यामध्ये कायम अग्रेसर असतात, रक्तदान ,पुस्तक दान ,अंधश्रद्धा निर्मूलन ,वृक्षारोपण पूरग्रस्तांना मदतअशा अनेक उपक्रमात त्यांनी भाग घेतला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भुजबळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे . अखिल भारतीय प्राथमिक शिक्षण संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदासजी बसवदे, राज्याचे सरचिटणीस कल्याणजी लवांडे
सल्लागार सुरेश भावसार , राज्याचे उपाध्यक्ष दीपक जी भुजबळ , सातारा जिल्हाध्यक्ष गणेश जाधव व कार्यकारणी सदस्यांनी अभिनंदन केले.
या पुरस्काराची रक्कम 11 हजार रुपये अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या कामाला देणार आहेत.
विजयकुमार भुजबळ यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करताना शंकरराव भुजबळ सल्लागार अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ