Sunday, September 7, 2025
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

मुंबई(रमेश औताडे) : राज्य प्रशासनात कणखर आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या हक्कांवर सविस्तर संवाद साधला. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील निवडक पाच दिव्यांग बांधवांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये सांगली जिल्ह्याचे ज्ञानदेव कदम आणि डॉ. सतीश लड्डा यांनी लक्षणीय ठसा उमटवला.

दोघांनी मांडलेले प्रेझेंटेशन पाहून मुंढे यांनी आपल्या स्टाफसमोरच कौतुक व्यक्त करत “असं प्रेझेंटेशन माझा स्टाफ सुद्धा करत नाही” अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे उपस्थितांचा आत्मविश्वास अधिक वाढला.

बैठकीत दिव्यांगांच्या आरक्षणाचा मुद्दा, शिक्षणातील अडथळे, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर चर्चा झाली. मुंढे यांनी धोरणात्मक स्तरावर कोणते बदल शक्य आहेत यावरही मार्गदर्शन केले.

सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधींची निवड हा केवळ सन्मान नसून दिव्यांग चळवळीच्या नेतृत्वात जिल्हा आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मत व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments