मुंबई : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामार्फत साजऱ्या होत असलेल्या भाद्रपद श्रीगणेश चतुर्थी उत्सवा निमित्त महिलांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मंदिर प्रांगणात महिलांसाठी “सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण” आयोजित करण्यात आले आहे.
या विनामूल्य कार्यक्रमासाठी महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर न्यासाने केले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंदिराकडून उपलब्ध करून दिलेला QR कोड स्कॅन करून नोंदणी करणे आवश्यक आहे.
🙏 श्रींच्या चरणी भक्तिमय वातावरण अनुभवण्याची ही एक आगळीवेगळी संधी असून गणेशभक्त महिला भाविकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.