स
ातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा पोलीस दलाने कुख्यात गुन्हेगार लखन भोसले याचे गणेशोत्सव काळातच पोलीस गोळीनेच विसर्जन केले आहे. तर त्याचा साथीदार अमर केरी याला ताब्यात घेतले आहे. या टोळीने लुटमार केलेल्या किमती ऐवज व सोन्याची ही तपासणी व्हावी. अशी आता मागणी पुढे आली आहे.
सातारा जिल्ह्यासह विविध ठिकाणी सराईत गुन्हेगार लखन भोसले व त्याच्या साथीदारांनी दरोडा, चोरी, चेन स्नॅचिंग असे सुमारे ३४ गुन्हे बारामती, इंदापूर, शाहूपुरी, कोरेगाव, वडूज, म्हसवड ,दहिवडी, सांगली, पुणे अशा अनेक ठिकाणी केले आहेत व गुन्हे करून पसार झाले आहेत.
गेल्याच आठवड्यात साताऱ्यातील कृष्णा नगर येथे सकाळी फिरण्यासाठी आलेल्या महिलेला कोयतेचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी विलासपूर या ठिकाणी लुटीचे प्रकार घडले. वास्तविक पाहता पोलिसांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र पोलीस संचलन केले. हमरस्त्यावरून पोलिसांची परेड झाली. मात्र ज्या ठिकाणी गुन्हे घडले आहेत. त्या ठिकाणी पोलिस यंत्रणा पोहोचली नाही. अर्थात पोलिसांची संख्या आणि समाजाची साथ याच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे. गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. परंतु त्यासाठी सबळ पुरावे आवश्यक असल्याचे काम पोलीस यंत्रणेला करावी लागते. काही वेळेला साक्षीदार फुटतात. पुरावा गोळा करण्यास अडचणी येतात. जातीचेही समीकरण आडवी येते. अशा वेळेला सराईत गुन्हेगारांना गोळी दिल्याशिवाय त्यांचे विसर्जन होत नाही. हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. परंतु, लुटमार करून जगणे. अनाधिकृत धंदे व हप्तेबाजी करून जगणे म्हणजे समाजाला कॅन्सर सारखी कीड आहे. ती वेळीच नष्ट केली पाहिजे. अन्यथा असे अनेक मोकाट गुन्हेगार लखन भोसले आजही समाजात वावरत आहेत. कारण, त्यांची बाजू घेणारे सर्व क्षेत्रांमध्ये लपून बसलेले आहेत. सराईत गुन्हेगारांनी लुटमार केलेली आहे. त्या लुटमारीचा ऐवज व सोने कुठे जात असेल? याचा तपास होणे सुद्धा गरजेचे आहे. त्यांच्याही मुखवट्या मागचे चेहरे ज्यांच्या समोर आले पाहिजे. असं गौरी सणानिमित्त महिलावर्ग सांगत आहेत.
सातारा पोलीस दलातील धाडसी व अन्याय विरोधी प्रचंड चीड असणारे नवे चेहरे हा खऱ्या अर्थाने गुन्हेगारांसाठी घटनेच्या चौकटीतच राहून कर्दन काळच ठरले आहेत.
कुख्यात गुन्हेगार लखन पोपट भोसले याला धाडसाने पकडणारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस सुजित भोसले, तुषार भोसले, सागर गायकवाड, अजिंक्य माने, शामराव काळे, आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र मस्के हे सर्वच कौतुकास पात्र आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने गणपती उत्सवामध्ये सातारा शहरातील डी.जे डॉल्बी चा आवाज कमी करून कायद्याचा आवाज लोकांना पसंत पडेल एवढा वाढवला आहे. हे समाधानकारक बाब आहे. हा आवाज कुणाचा…. सातारा पोलीस दलाचा… अशी घोषणा दिल्यास वावगे ठरणार नाही.
सातारा पोलिसांना नेहमीच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अवघड काम करावे लागते. काही वेळेला चेतावणीखोर वक्तव्य, राजकीय वरदहस्त मिळाल्यामुळे जातीय तणाव निर्माण होत असताना कोणालाही अटक न करता आदेश पाळावे लागतात. ती जर बाजू पाहिली तर लखन भोसलेचा खातमा करण्यासाठी सातारा पोलिसांचे मनोधैर्य वाढवणे निश्चितच समाजाचेही जबाबदारी आहे.
आज सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो सातारा पोलीस दलाचा हक्क नक्कीच आहेत. परंतु, आता गुन्हेगार लखन भोसले यम सदनी गेला आहे. आता त्याचा साथीदार अमर केरी याच्याकडून अनेक घटना व चोरीचा माल नेमका कुठे गेला? हे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी शौर्य दाखवावे.
पुण्यातील गुन्हेगार डी.डी. सिंग नंतर लखन भोसले याला अखेर त्यांच्याच कृतीने सातारा पोलिसांकडून शिक्षा झालेली आहे. ज्यांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्यांचा सातारा पोलीस दलाने ही येतोचित सत्कार करावा. यापुढेही सातारा पोलिसांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे व शौर्याचे असेच स्वागत होईल. तरच खऱ्या अर्थाने साताऱ्यातील गुन्हेगारीची एक बाजू नाहीशी होईल. त्याचबरोबर दुसरीही बाजू आहे. जी गुन्हेगारांच्या साठी पायघड्या घालत आहेत. त्यांच्यावरही अंकुश ठेवणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था ही फक्त समाजाची गरज असली तरी समाजाने आपले कर्तव्य पार पाडताना आपणही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किती काळजी घेतो? याचे आत्मचिंतन करावे. आवश्यक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. असल्यानेच गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. घटना घडल्या नंतर त्याच दिवशी शाहूपुरी येथील चिंतामणी हौसिंग सोसायटीमध्ये एका व्यक्तीवर जीव घेणे हल्ला झाला. एवढं गुन्हेगारांचे धाडस वाढलेले आहे का ?त्याबाबतही सातारा जिल्हा पोलिसांनी विचार करावा. अशी मागणी शाहूपुरीतील नागरिकांनी केली आहे. शेवटी सातारा पोलिसांच्या पाठीशी सामान्य जनता जशी ठाम आहे. तसेच गुन्हेगारांपासूनही चार हात लांब राहण्याची श्री गणरायांनी बुद्धी द्यावी. अशी मागणी भाविक करत आहेत.
______________________
फोटो — सातारा पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.