प्रतिनिधी : पूर्वीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सवात मराठी भाषा कला आणि संस्कृतीचा जागर अनुभवास मिळतो. पण अलीकडच्या काळात गणेशोत्सव मंडळ उदंड झाली. मनोरंजनाच्या नावाखाली कलाविष्कार कमी आणि धांगडधिंगा अधिक बघायला मिळतो. अशाही परिस्थितीत महाराष्ट्राची कला संस्कृती टिकावी,आणि गणेशभक्तांचे आणि जनतेचे दोन घटका करमणूक मनोरंजन व्हावे म्हणून, गोकुळ दूधसंघातर्फे मुंबईत कुर्ला, गिरगाव, ठाणे आणि डोंबिवली तसेच नवी मुंबई परिसरात चार असे एकूण आठ कार्यक्रमाचे आयोजन १ ते ५ सप्टेंबर दरम्यान त्या ठिकाणच्या गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचे सादरीकरण इमेज इम्पॅक्ट क्रिएशन करणार आहे.
गोकुळ दूध संघाच्या या मनोरंजन कार्यक्रमात चित्रपट , नाट्य आणि टेलिव्हिजनचे आघाडीचे कलावंत गायिका गायक तसेच स्टँडअप कॉमेडियन आपली कला सादर करणार आहेत. विनोदाचा बादशाह पंढरीनाथ कांबळे, गुणी अभिनेत्री ऋतुजा बागवे, माधवी जुवेकर आणि दीप्ती लेले, सुप्रसिद्ध गायिका अक्षता सावंत,सुप्रसिद्ध गायक रविंद्र खोमणे यांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे. त्याशिवाय गायिका अंशीका चोणकर, सपना हेनम, अनुष्का शिकतोडे, रेश्मा रमेश, प्रणव देहरेकर, जितेंद्र तुपे, श्रीरंग भावे, साईबा ओव्हळ हे हिंदी मराठी गाण्यांची मैफल रंगवणार आहेत.तर स्टँडअप कॉमेडियन शैलेश मेस्त्री, राजदीप कदम आणि दिव्येश शिरवाडकर आपल्या अदाकारीने हास्य फुलविणार आहेत. या कार्यक्रमात नृत्य, लोककला, महिलांसाठी खास खेळ, स्टँडअप कॉमेडी, मराठी हिंदी सुमधुर गीते आदी मनोरंजनाचा नजराणा पेश होणार आहे, अशी माहिती इमेज इम्पॅक्ट क्रिएशनचे दिग्दर्शक गौरव ठाकूर यांनी दिली.
गणेशोत्सवात गोकुळ दुधतर्फे मराठी कला संस्कृतीचा जागर
RELATED ARTICLES