प्रतिनिधी : लवंडमाची येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 45 जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली.
कार्यक्रमा ठिकाणी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल जामदार सचिव विजय दुर्गावळे. तसेच रोटेरियन दिलीप संकपाळ, संजय बडदरे, चंद्रशेखर दोडमणी , सुनील बसुगडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले होते. रक्तदात्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शिबिरात सहभागी झालेल्या युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने रक्तदान केले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून त्यातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, या जाणिवेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे भावी काळात गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासणार नाही, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.