मुंबई : गिरणगावचा गणपती म्हणून ओळख असलेल्या,परेलच्या टाटा मिल कंपाऊंड,सार्वजनिक गणेशोत्सव बाळ गोपाळ मंडळ, ऊत्सवाला,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी शनिवारी भेट देऊन, परळच्या सम्राटचे दर्शन घेतले.
केंद्र सरकारच्या आखत्यारितील टाटा मिल कंपाऊंड मध्ये गिरणी कामगार आणि काबाडकष्ट करणारे रहिवासी मोठ्या संख्येने रहातात.राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते या नतृत्वाच्या अथक प्रयत्नांमुळे या एनटीसी गिरण्यांच्या धोकादायक चाळींचे म्हाडा द्वारे पुनर्वसन होणार आहे.त्यासाठी सरकारद्वारे कामगार व रहिवाशांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. संघाच्या या कामाला गिरणी चाळ भाडेकरू संघाचे सहकार्य लाभत आहे.त्यामुळे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी दिलेल्या परळच्या ‘सम्राट गणेश” भेटीला महत्त्व निर्माण झाले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळी लोकमान्य टिळक यांनी लोकजागृतीसाठी या सार्वजनिक गणेशोत्सवा ची प्रथा सुरू केली. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग कामगारांनी गिरणीचाळ पूनर्वसनाच्या प्रश्नावर अधिक संघटीत होण्यासाठी लोकमान्यांचे विचार अमलात आणतांनाच राष्ट्रीय नेत्याचे स्वप्न साकार करावे,असे आवाहन आमदार सचिन अहिर यांनी कामगार आणि चाळ रहिवाश्यांसी बोलताना केले.मंडळाघे अध्यक्ष आणि रा.मि.म.स़ंघाचे सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी सचिन अहिर यांचे पुष्पगुच्छा देऊन स्वागत केले.या प्रसंगी सेक्रेटरी देवेंद्र केळुसकर,संघाचे संघटन सेक्रेटरी दीपक राणे आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भैरवाच्या रूपात सादर करण्यात आलेल्या रेखीव मूर्तीच्या दर्शनासाठी मागील बुधवार पासून गणेश भक्तांची मोठीच गर्दी लोटलेली दिसते.
उत्सवाद्वारे संघटित होऊन लोकमान्य टिळकांचे स्वप्न साकार करा!सचिन अहिर यांचे गणेशोत्सवात आवाहन!
RELATED ARTICLES