घावरी (ता. महाबळेश्वर) येथील दाभे मोहनचे सुपुत्र व सध्या इटलीमध्ये वास्तव्यास असलेले समाजसेवक श्री. चंदन सुनीता राजाराम चव्हाण यांना घावरी ग्राम सेवा संघ, मुंबई व ग्रामस्थ मंडळ घावरी यांच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप मानाची शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे होते. या कार्यक्रमाला श्री. चव्हाण यांच्या पत्नींचीही उपस्थिती लाभली.
समाजकार्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत, विविध उपक्रम राबवून श्री. चंदन चव्हाण यांनी सातत्याने समाजासाठी मोलाची कामगिरी केली आहे. गावोगावी सौर ऊर्जा उपकरणांचे वाटप, स्वच्छ पाण्यासाठी फिल्टर वितरण, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राला पाठबळ, तसेच विविध सामाजिक उपक्रमांतून सतत योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती श्री. संजुबाबा गायकवाड अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय जाधव, उद्योजक श्री. अंकुश शेट मोरे, समाजसेवक श्री. सोमराज शिंदे, उद्योजक श्री. शांताराम कदम, ३२ गाव सचिव श्री. अरुण कदम गुरुजी, सरपंच अकबर भाई शारवान, उपसरपंच श्री. विजय सकपाळ, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश सकपाळ, शाखाप्रमुख श्री. रमेश सकपाळ, १२ गाव समाज उपाध्यक्ष श्री. राजाराम सकपाळ, श्री. नारायण एच. सकपाळ, माजी पोलीस पाटील श्री. नामदेव सकपाळ, श्री. किसन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई मंडळाचे कार्यकर्ते तसेच घावरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. तानाजी सकपाळ यांनी केले.