प्रतिनिधी : दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक मधील मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मतमोजणी दरम्यान टेबल क्रमांक ५८ वर हेराफेरी झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्याचे पुरावे निवडणूक अधिकारी, राज्यपाल, मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे सादर केल्याचे घुमरे यांनी सांगितले.
दिपक मदने, कविता विशे, वर्षा माळी, मुंजा गिरी आदी उमेदवार उपस्थित होते.
उमेदवार दिपक मदने आणि कविता विशे यांनी पारदर्शकतेसाठी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली फेरमतमोजणीची मागणी केली आहे. अनियमिततेमुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यामुळे सर्व पॅनेल एकत्र येऊन पारदर्शकतेची लढाई लढणार आहोत, असे उमेदवारांनी स्पष्ट केले.