मुंबई : अस्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीने बोरिवली येथील स्काय सिटी मॉल येथे आज दुसऱ्या बुलियन फ्लॅगशिप स्टोअरचे उद्घाटन करण्यात केले. ओबेरॉय रिअल्टीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विकास ओबेरॉय हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सच्या कार्यकारी अध्यक्षा अक्षा कंबोज या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
अस्पेक्ट बुलियन स्टोअरमध्ये सध्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याचे बार, ९९५ शुद्धतेच्या सोन्याचे बार आणि ९९९ शुद्धतेच्या चांदीचे बार उपलब्ध आहेत. तुम्ही ०.५ ग्रॅम ते १०० ग्रॅम आकाराची सोन्याची नाणी आणि बार खरेदी करू शकता, तर चांदीचे बार ५ ग्रॅम ते १ किलो पर्यंत उपलब्ध आहेत. ब्रँडने ०.१०० मिलीग्राम ते ०.५०० मिलीग्रामपर्यंत मायक्रो-गोल्ड उत्पादने देखील लॉन्च केली आहेत.
उद्घाटनप्रसंगी बोलताना, अस्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे सीइओ दर्शन देसाई म्हणाले की, “ वैयक्तिकृत बुलियन (सराफा) प्रॉडक्ट किंवा आगामी वेंडिंग मशीन्सद्वारे, ज्यामुळे बुलियन अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होईल. परंपरा आणि नावीन्य यांचे मिश्रण करणे हा आमचा दृष्टीकोन आहे.”
अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्स च्या कार्यकारी अध्यक्षा अक्षा कंबोज म्हणाल्या की , “आम्ही भारतभरातील ग्राहकांसाठी विश्वास, नवकल्पना आणि लक्झरीचे टचपॉईंट तयार करत आहोत. यावर्षी संपूर्ण मुंबईत किमान पाच दालनांचे नियोजन आहे. पुढील १२-१८ महिन्यांत सोने आणि चांदीची नाणी तसेच बारसाठी वेंडिंग मशीन आणण्याची कंपनीची योजना आहे. ही वेंडिंग मशीन्स देशभरातील मंदिरे, मॉल्स आणि विमानतळांवर बसवली जातील.