मुंबई(रमेश औताडे) : टायगरमंक या फिल्म आणि मीडिया प्रॉडक्शन हाऊसनं “ऐतिहासिक गणपती मंदिरे” या शीर्षकाखाली पाच भागांची माहितीपट मालिका सादर केली आहे. त्रिशुंड गणपती, खिंडीतला गणपती, गुपचुप गणपती, मोदी गणपती आणि मातीचा गणपती या पुण्यातील विस्मृतीत गेलेल्या मंदिरांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा यात उलगडण्यात आला आहे.
या मालिकेचं प्रकाशन इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांच्या हस्ते करण्यात आलं असून त्यांनी सूत्रधाराची भूमिकाही निभावली आहे. यावेळी टायगरमंकचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य राठी, कार्यकारी संचालक शैलेश बडवे आणि केतन जाधव उपस्थित होते.