मुंबई(रमेश औताडे) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात यावी, अशी मागणी क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले युवा सामाजिक संस्थेकडून करण्यात आली आहे. समाज जीवनातील अन्याय, शोषण व विषमता याविरोधात आपल्या लेखणीतून व गीतांतून आवाज उठवणाऱ्या अण्णाभाऊंच्या विचारांची जाणीव पोलीस दलालाही व्हावी, यासाठी ही विनंती करण्यात आली आहे.
मुंबईतील मानखुर्द महाराष्ट्र नगर, लल्लुभाई कंपाऊंड, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर, मंडाळा मातंग ऋषी नगर, विलास गोपले नगर, सोनापूर या वस्ती मध्ये मातंग सामाजाचे लोक रहातात. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे प्रेरणास्थान आहे त्यामुळे मानखुर्द पोलिस स्टेशन मध्ये त्यांची प्रतिमा लावावी अशी मागणी दिनेश पांजगे यांनी केली आहे.