Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना; नवी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीत...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना; नवी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीत बदल

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका ठाम ठेवत मनोज जरांगे पाटील आणि मोठा आंदोलक ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. राज्यभरातून लाखो लोकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. येत्या शुक्रवारी (दि. २९) रोजी ते आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

मनोज जरांगे यांचा ताफा नवी मुंबई मार्गे मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. डीसीपी तिरुपती काकडे यांनी बुधवारी जारी केलेल्या आदेशानुसार, काही मार्गांवर निर्बंध लागू केले असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोणते मार्ग बंद?

  • पळस्पे गव्हाणफाटा–पामबीच–वाशी हा मार्ग आंदोलकांच्या ताफ्यासाठी राखीव.
  • लोणावळा–खोपोली व खालापूर–शेडुंग मार्गे येणाऱ्या वाहनांना पनवेल शहर व कळंबोली परिसरातील महामार्गावर प्रवेश बंद.
  • मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कोनफाटा व बोर्ले टोलनाका ते पळस्पे फाटा मार्ग बंद.
  • पळस्पे फाटा–डि पॉईंट जेएनपीटी व गव्हाण फाटा–किल्ला जंक्शन मार्ग अवजड वाहनांसाठी बंद.
  • वाशी प्लाझा व वाशी रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक बंद.

पर्यायी मार्ग :

  • जेएनपीटी मार्गावरील हलकी वाहने व दुचाकी : कळंबोली सर्कलमार्गे पनवेल–शीव महामार्ग किंवा साईगाव–दिघोडे–चिरनेर मार्ग वापरू शकतील.
  • वाशीला जाणारी हलकी वाहने : पनवेल–शीव महामार्गावरून सानपाडा स्थानकाजवळील सेवा मार्गाचा वापर करू शकतील.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की हे निर्बंध फक्त आंदोलनाच्या कालावधीत लागू राहतील. आपत्कालीन सेवा जसे की रुग्णवाहिका, अग्निशमन व जीवनावश्यक सेवा वाहने यांना मात्र सूट असेल. वाहनचालकांनी गर्दी व अडचणी टाळण्यासाठी पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments