मुंबई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. योगेश वसंत त्रिवेदी आणि *‘आहुति’*चे संपादक श्री. गिरीश वसंत त्रिवेदी यांच्या निवासस्थानी गेल्या दीड दशकाहून अधिक काळ पर्यावरणपूरक श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू आहे.
या काळात अंबरनाथ ते बोरीवली असा बाप्पाचा दरवर्षी प्रवास घडतो. दरम्यान, भगिनी सौ. तृप्ती नरेश त्रिवेदी यांच्या सूरत येथील निवासस्थानीही या बाप्पाचे आगमन झाले होते.
यंदा बोरीवली येथील निवासस्थानी पर्यावरणपूरक, मनमोहक आणि त्रिधातूची ही बाप्पाची छबी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरणपूरकतेचा संगम साधणारी ही गणेशोत्सवातील अनोखी परंपरा परिसरातील भाविकांना विशेष भावत आहे.