मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नायगाव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे यांच्या संकल्पनेतून “गणेश पूजा साहित्य” विभागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या साहित्य उपक्रमाचे अनावरण करण्यात आले.
या उपक्रमाचे अनावरण शिवसेना सचिव व आमदार श्री. मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी पार पडले. सदर प्रसंगी आमदार श्री. सुनिल शिंदे, सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे, युवासेना शाखा क्र. २०१ चे शाखाधिकारी रोहन सुरेश काळे तसेच स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गणेशोत्सव काळात नागरिकांना आवश्यक पूजासाहित्य सहज उपलब्ध होणार असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.