मुंबई : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, पंचरत्न मित्र मंडळ व आदर्श मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या सैनिकांचा तसेच मागास समाजाच्या जीवनमान उंचावण्यासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यंदाचा सोहळा संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त इंडियन एक्सलन्स पुरस्कार वितरणाने अधिक विशेष ठरणार आहे. हा कार्यक्रम रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विक्रोळी (पूर्व) येथील विकास कॉलेज, कन्नमवार नगर येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमातील पुरस्कारांचे वितरण सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते होणार असून, अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाबाबत सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डी.एफ. निंबाळकर यांनी माहिती दिली.