Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रसातबाऱ्याची ताजी माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर - महसूल मंत्री

सातबाऱ्याची ताजी माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर – महसूल मंत्री

मुंबई(रमेश औताडे) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची सुरुवात नुकतीच केली असल्याने शेतकऱ्यांना आता सातबारा व जमीन संदर्भात ताजी माहिती मिळणार आहे.

२००२ पासून ७/१२ संगणकीकरण, मिळकत पत्रिका संगणकीकरण, भूमी नकाशांचे संगणकीकरण, तसेच भू-संदर्भिकरण यांसारखी पायाभूत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. भविष्यात या सेवेमध्ये एआयचा वापर करता येईल का याबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच संकेतस्थळाशिवाय व्हॉट्सॲपवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी यावेळी सांगितले.

‘महाभूमी’ संकेतस्थळावर ७/१२, ८-अ, ई-चावडी, ई-हक्क, फेरफार अर्ज स्थिती, पीक पाहणी, आणि महाभूनकाशा यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. तसेच, नागरिक या संकेतस्थळावर ७/१२ पाहू शकतात, ७/१२ डिजिटल स्वाक्षरी केलेला मिळवू शकतात आणि फेरफार अर्जाची स्थिती तपासू शकतात.

भूमी अभिलेखांचे गूढ उकलणे या संकल्पने अंतर्गत ही ‘भूमित्र’ चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली असून जमीन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी २७३ प्रश्नांचा संच तयार करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments