Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रपैलवान तानाजी चवरे (आप्पा) यांना मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न २०२५ मध्ये...

पैलवान तानाजी चवरे (आप्पा) यांना मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न २०२५ मध्ये कोल्हापूर येथे विशेष सन्मान

प्रतिनिधी : भारतामध्ये दरवर्षी २९ ऑगस्टला मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो ध्यानचंद यांना इतिहासातील सर्वोत्तम बाकी पैकी एक मानले जाते. त्यांना हॉकीचा जादूगार असे सुद्धा नावाने ओळखले जाते. त्यांनी १९२८ ,१९३२ आणि १९३६ मध्ये भारताला ऑलिम्पिक मध्ये तीन सुवर्णपदके जिंकून दिली. त्यांच्या चेंडूवरील नियंत्रणासाठी आणि गोल करण्याच्या कौशल्यासाठी ते जगभरात प्रसिद्ध आहेत
मेजर ध्यानचंद २९ऑगस्ट रोजी वाढदिवसाच्या औचित्य साधून मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडात्न पुरस्कार २०२५ च्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्री पैलवान तानाजी चवरे (आप्पा ) यांचा विशेष सन्मान हॉकी तीडेज पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती आणि दिल्ली पॅरा मेडिकल बोर्ड कालीरमन फाउंडेशन इंडिया यांच्यावतीने राजश्री शाहू छत्रपती सांस्कृतिक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजे समरजीत घाडगे (अध्यक्ष श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोडूसर शाहू उद्योग समूह ,कोल्हापूर)तसेच हिंदकेसरी दीनानाथ सिंह (पाचवी हिंदी केसरी शिवछत्री पुरस्कार प्राप्त)माननीय प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण ढोबळे(संस्थापक अध्यक्ष शाहू शिक्षण संस्था पंढरपूर) यांच्या शुभहस्ते कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमात पैलवान सुनील साळुंखे (हिंदकेसरी डीवायएसपी महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार)माननीय प्राचार्य लक्ष्मण ढोबळे मान्य सुधारकर कारेकर (कोल्हापूर शैक्षणिक व सामाजिक शिक्षक रत्न पुरस्कार)पैलवान विजय चौधरी(जागतिक विजेता ट्रिपल महाराष्ट्र केसरी डी.वाय.एस.पी.प्रेरणा पुरस्कार) यांना पुरस्कार मूर्ती घोषित केले आहे. प्रमुख उपस्थिती अजय साळुंखे रोहित पटेल हरीश कदम सुरेंद्र काली रमण पैलवान धनंजय पाटील अवश्य जगताप दीपक लोखंडे अभिजीत चापेकर विनोद शिंदे दीपक मानकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. श्री पैलवान तानाजी चवरे( आप्पा ) यांचा विशेष सन्मानाबद्दल महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments