Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रलेट्स इमॅजीनचा बाप्पा साहित्य प्रसाद उपक्रम ; वाडा, विक्रमगड, कोल्हापूर आणि कोकणातील...

लेट्स इमॅजीनचा बाप्पा साहित्य प्रसाद उपक्रम ; वाडा, विक्रमगड, कोल्हापूर आणि कोकणातील जिल्हा परिषद शाळांना होणार वितरण

प्रतिनिधी: बाप्पाच्या दर्शनाला येतांना फळं, मिठाई प्रसादासाठी आणण्याऐवजी शैक्षणिक साहित्य, चित्रकलेचे साहित्य, खेळाचे साहित्य तसेच मूठभर खाऊ आणावा, जो वाडा , विक्रमगड , पालघर, कोल्हापूर आणि कोकणात देवरुख या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आपल्या छोट्या दोस्त मंडळींना देता येतील, असे आवाहन लेट्स इमॅजिन टूगेदर फाउंडेशन ने केले आहे. लेट्स इमॅजिनच्या बाप्पा साहित्य प्रसाद उपक्रमाचे यंदाचे हे ७ वर्ष आहे. गेल्या वर्षी २२ जणांनी यात सहभाग घेतला होता. घरगुती गणपती सोबत सार्वजनिक गणपती मंडळही या वर्षी हा उपक्रम करीत आहेत, अशी माहिती लेट्स इमॅजीनच्या पूर्णिमा नार्वेकर यांनी दिली. आपणही या उपक्रमांत सहभागी होऊ शकता. आपल्या घरी बाप्पा येत असेल तर आपण सुध्दा हा उपक्रम आपल्या घरी करू शकता, असे ही पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले. गेली ६ वर्ष या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळालाआहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सौ. पूर्णिमा नार्वेकर यांच्या समवेत ९८२०००३८३४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments